विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : नवयुवक क्रिकेट क्लब, शिंदोला यांच्या वतीने भव्य ‘आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व क्रिकेटला चालना मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्नी. संजय देरकर, आमदार वणी विधानसभा यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्नी. मॅनेजर साहेब, ACC अदानी सिमेंट हे उपस्थित राहणार आहेत.
या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी संघांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून
पहिले बक्षीस – ₹७०,०००,
दुसरे बक्षीस – ₹५०,०००,
तिसरे बक्षीस – ₹३०,०००,
चौथे बक्षीस – ₹२०,००० असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
या स्पर्धेमुळे परिसरातील तरुण क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. नवयुवक क्रिकेट क्लब, शिंदोला यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


