ठळक बातम्या

    वणीच्या नृसिंह व्यायाम शाळेची विदर्भात दमदार कामगिरी; ‘ग्रामगीता चषक’ कबड्डी स्पर्धेत तृतीय पारितोषिक

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेत वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय पारितोषिक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे वणी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

    हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर आणि श्री गुरुदेव क्रीडा मंडळ गोवरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामगीता चषक’ भव्य पुरुष व महिला मिनी विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील नामांकित संघांनी सहभाग घेतला होता.

    स्पर्धेत प्रथम पारितोषिक मराठा लान्सर नागपूर यांनी पटकावले, तर द्वितीय पारितोषिक जय सेवालाल देवठाणा वाशिम या संघाला मिळाले. तृतीय क्रमांक वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या संघाने मिळवत आपली क्रीडाप्रतिभा सिद्ध केली.

    नृसिंह व्यायाम शाळेच्या कबड्डी संघाने प्रशिक्षक कुणाल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हे यश संपादन केले. संघातील सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे क्रीडाप्रेमींकडून व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.




    Photo