ठळक बातम्या

    झरी तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार ५ ब्रास मोफत वाळू देण्याची मागणी

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    झरी : झरी तालुक्यातील विविध घरकूल योजनांचे लाभार्थी असलेल्या गरीब, गरजू व वंचित घटकांतील नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरपंच संघटना झरी जामणी तालुका अध्यक्ष निलेश म. येल्टीवार , वणी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल द. धांडेकर,श्रीकांत अनमूलवार,आसिफ कुरेशी,लुकेश शिरपूरकर,राकेश गालेवार व अंकीत खडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    सदर मागणी ही गौण खनिज महसूल व वनविभागाच्या ८ एप्रिल २०२५ व ३० एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयाच्या अनुशंगाने करण्यात आली आहे. भारतीय संविधानातील कलम ३४०, ३४१ व ३४२ नुसार ओबीसी, अनुसूचित जाती व जमातींना सामाजिक न्यायाच्या दृष्टीने संरक्षण देऊन सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने शासन विविध घरकूल योजना राबवत आहे.

    दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पासून झरी तालुक्यात पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिम आवास योजना, मोदी आवास योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांना वाढत्या वाळू दरामुळे घरकूल बांधकामात अडचणी येत असून, शासन निर्णयानुसार मोफत वाळू मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा लाभार्थ्यांचे घरकूल अपूर्ण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



    Photo