विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : जनसामान्यांमध्ये संस्कृत आणि संस्कृतीचे प्रेम जागृत करणे आणि त्याच्या नित्य उपयोजनासाठी प्रेरित करणे हे ध्येय असणाऱ्या संस्कृत भारती च्या वणीशाखेच्या वतीने टागोर चौकात असणाऱ्या श्री शिव मंदिरामध्ये टागोर चौक महिला मंडळाच्या समन्वयाने महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे महाकवी पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्रासह अन्य शिवस्तोत्रांचे सामूहिक पठण संपन्न करण्यात आले.
संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारिणी सदस्य सौ. प्रणिता भाकरे यांच्या मार्गदर्शनात ज्योती कोंडावार, चित्रा उत्तरवार ,स्मिता गोरंटीवार ,मेघा गोरंटीवार ,अनुश्री सालकाडे शालिनी गंगशेट्टीवार ,अमिता गंजीवार ,कल्पना गुंडावार,शुभांगी सुरावार,सुषमा खणगण या भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये विशेषत्वाने सहभाग नोंदविला.
संस्कृत भारतीच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे.

