ठळक बातम्या

    नीलजई OCM खदान येथे शिवजयंती उत्साहात साजरी; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाप्रसादाने समारोप

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : नीलजई OCM खदान येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सोहळ्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवकांनीच नियोजन, सजावट, व्यवस्था आणि कार्यक्रमाची जबाबदारी खांद्यावर घेत संपूर्ण परिसर शिवमय केला. “जय भवानी… जय शिवाजी!” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खदान व्यवस्थापक प्रतापसिंह पवार साहेब होते, तर उद्घाटक म्हणून सेफ्टी मॅनेजर किशोर वरुडकर साहेब उपस्थित होते. TSC सदस्य व्यंकटेश साहेब, संजयजी खाडे साहेब तसेच सर्व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाची सुरुवात काली मातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शिवाजी महाराज व भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड करण्यात आली.

    प्रमुख वक्ते मा. तुळशीदास जुंजुरकर व ॲड. संदीप गोहाकर यांनी ओजस्वी भाषणातून शिवचरित्र, स्वाभिमान आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहनजी वैद्य यांनी मानले.

    कार्यक्रमाचा समारोप सर्वांसाठी आयोजित महाप्रसादाने करण्यात आला.

    नीलजई OCM मधील हा शिवजयंती सोहळा युवकांच्या जोश, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. 




    Photo