ठळक बातम्या

    जैताई देवस्थानात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, नूतन वर्षापासून सुरू होत असलेल्या नवरात्राच्या निमित्ताने वणीची ग्रामदेवता असणाऱ्या जैताई देवस्थानामध्ये ध्वजारोहण, नित्य पूजन, अभिषेक, आरती इत्यादी धार्मिक विधींच्या सोबतच आध्यात्मिक प्रबोधनाच्या दृष्टीने शनिवार दिनांक २१ ते बुधवार दिनांक २५  मार्च २०२६ या कालावधीमध्ये कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.

             यामध्ये २१ तारखेला नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री विश्वास बुवा पाचपोर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, दि. २२ ते २५ असे चार दिवस मराठी विश्वामध्ये अमृतवक्ता स्वरूपात प्रसिद्ध असणारे श्री विवेक घळसासी यांची श्री राम चरित्र दर्शन माला ही प्रवचन मालिका सादर होईल. 

            जैताई देवस्थानाच्या भव्य प्रांगणामध्ये रोज सायंकाळी ७ ते ९ या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या सुवर्णसंधीचा वणीकर आणि परिसरातील जनतेने बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जैताई देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येत आहे.



    Photo