ठळक बातम्या

    वणीत माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न सिने अभिनेते किशोर बळी यांची उपस्थिती

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : कलावंत सदाशिव बापूराव आदे, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी  यांच्या वतीने 

    दिनांक 28 फेब्रुवारी ला  सकाळी ९ वाजता शेतकरी मंदिर वणी येथे माळी समाजातील सुशिक्षित युवक-युवतींसाठी विदर्भ स्तरीय भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हजारो पालकांसमोर शेकडो लग्न ऐच्छिक  मुला-मुलींचा थेट परिचय, संवाद व बायोडाटांची देवाणघेवाण करण्यात आली. हा मेळावा समाजबांधवांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी अमूल्य संधी प्रदान करणारा ठरला आहे.

    सकाळी 10.30 वाजता हे मानवा तुला वंदना ही प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रम चंद्रपूर येथील कलावंतांनी सादर केला 

    दुपारी 12  वाजता वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन कुंभ्याचे सरपंच अरविंद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर विनोदकुमार आदे लिखित बाप या काव्यसंग्रहाचे व तसेच सहजीवन या वधू वर परिचय पुस्तिकेचे सिने अभिनेते तथा सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले 

    या प्रकाशन सोहळ्याकरिता,एडवोकेट देविदास काळे, 

    स्वराज प्रकाशनाचे दत्ताजी डोहे, क्रिष्णा महादुरे, तहसीलदार उत्तम निलावाड, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुवार, संजय खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, प्राचार्य संजय ठावरी पोर्णिमाताई शिरभाते, परिसेविका अरुणाताई गुरनुले, एडव्होकेट कुशाल शेंडे, अभय निकोडे, कन्हैयाजी वाडगुरे, प्रमोद वासेकर, सुरेश रायपुरे, मंगेश चटारे, संतोषकुमार जयस्वाल, विजय रामटेके, मनीषाताई निब्रड, सुमित्राताई गोडे, रूपालीताई कुरेकर आदींची उपस्थिती होती.

    या मेळाव्यात समाजातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 

    समाजभूषण पुरस्कार वितरित करण्यात आला 

    त्यात प्रबोधनकार नागोराव शाहीर गुरनुले, लेखिका कवी विचारवंत प्रतीक्षाताई गुरनुले, नृत्य दिग्दर्शिका आस्था दहेकर

    चित्रकार रांगोळीकार शिल्पकार पवन मोहुर्ले यांचा समावेश होता.

    तसेच व्यसनमुक्तीसाठी अमूल्य योगदाना करिता पिंपरी कायर चे संत खेमराज महाराज यांना जीवन गौरव तर चाळीस वर्षे आरोग्य सेवा देणारे डॉ. श्रीकांत भगत यांना'आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    दुपारी तीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

    यात गीत गायन स्पर्धा,  एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली. एक से बढकर एक नृत्य अविष्काराने तसेच खेड्यापाड्यातील थोर लहान गायकांनी ऑर्केस्ट्रा च्या तालावर अप्रतिम गीते सादर केली.

    सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण व आशा सेविका आणि महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार पार पडला. त्यानंतर हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या फेम  किशोर बळी यांच्या हास्यबळी डॉट कॉम या कार्यक्रमाचा लाभ उपस्थित प्रेक्षकांनी घेतला. 

    या भव्य दिव्य  मेळाव्याच्या  आयोजनासाठी संयोजक डॉ. विनोदकुमार आदे, उपसंयोजक भवानी मांदाडे, (अध्यक्ष) महेश चौधरी (उपाध्यक्ष),  भास्कर वाढई (सचिव) व समितीचे सदस्य बापूजी वाढई, गजानन वाढई, विठ्ठल गुरनुले, राजू शेंडे, भास्कर मोहुर्ले, विजय लेनगुरे, अजय सोनुले, अक्षय निकोडे यांनी परिश्रम घेतले. 




    Photo