ठळक बातम्या

    गॅस सिलेंडर तुटवड्यावर महिला काँग्रेसचा संताप; वणीत चुल पेटवून मोदी सरकारविरोधात आंदोलन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे महिलांना स्वयंपाक कसा करायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना आवारी यांच्या नेतृत्वाखाली दि. १४ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.


    घरगुती गॅसचा तुटवडा व वाढती दरवाढ यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी चौकात चुल पेटवून केंद्रातील  सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. महिलांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली.


    यानंतर वसंत जिनिंग येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संध्या सवालाखे व वंदना आवारी यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील  सरकारवर जोरदार टीका केली. घरगुती गॅसचे वाढलेले दर तात्काळ कमी न केल्यास महिला काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


    या आंदोलनात सौ. साधना गोहोकर, शारदा ठाकरे, करुणा कांबळे, प्रमिला पावडे, अल्का मोहाडे, सविता गंधेवार, मंदा सोनारखन, प्रमिला गोहोकर, कलावती कौरासे, सविता रासेकर, माया गाडगे, वंदना चवले यांच्यासह मा. श्री. संजय खाडे(महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव) विवेक पानघाटे(वणी तालुका कांग्रेस अध्यक्ष) प्रमोद वासेकर (वसंत जिनिंग अध्यक्ष), बोढे, रवी कोटावार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.





    Photo