विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : झुंबा योगा ग्रुप रविनगर वणी च्या वतीने महीला दिन कार्यक्रम साला बादा प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. विद्याताई आत्राम नगराध्यक्षा न .प.वणी यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी प्रमुख उपस्थिती ,डॉ.संचिता नगराळे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, तसेच ग्रामगिताचार्य विजया देहेकर यांची होती. विचारपिठावर सौ, किरण नळे, सौ, साधना गोहोकर, सौ, भावना पोटदुखे व सौ, उमदा शेंडे हया उपस्थित होत्या
या प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ विद्याताई आत्राम म्हणाल्यात आज महीला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना दिसतात कारण व्याना काम करण्याची संधी मिळाली. चुल आणि मुल एवढ्या मर्यादित दृष्टीकोणातून कालपर्यंत बघीतले जायचे त्यांना संधी मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रात पादाक्रांत करण्याची किमया महीलानी केली. आज एकही क्षेत्र सुटले नाही की ज्यात महीला नाहीत पुरुषाच्या बरोबरीने त्या काम करतांना दिसतात याचे श्नेय क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या बरोबरच अनेक समाज सुधारकांना व घटनाकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यानाच द्यावे लागेल.
डॉ. संचिता नगराळे म्हणाल्यात महीलानी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहीजे त्याशिवाय तीला कुटुंबाचा गाडा निट हाकता येणार नाही
सौ. किरण नळे म्हणाल्यात आज समाजात वृद्धाश्रम का वाढत आहेत याचे भान महीलानी ठेवण्याची गरज आहे. विजया दहेकर यांचे ही भाषण झाले
उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच महीलाचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. वयाचे भान विसरुन
महीलानी नृत्यामध्ये नोंद विलेला सहभाग लक्षणीय होता.
तरुणींना लाजवेल अशा अदा महीलानी सादर केल्यात काहीनी नाटीका, म्रिमीक, फैन्शी ड्रेस आदी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले
कार्यक्रमांच्या निमित्ताने वयाची साठी, ओलाडंलेल्या महीला सौः सुषमा पाटील, पुष्पा कुळसंगे, शोभा हेपट ,छाया मुत्यलवार, नंदा शेडामे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आदल्या दिवशी महीलांच्या खेळण्याच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्यात बक्षिसपात्र महीलानां बक्षिस तर सर्व महीलांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे बहारदार संचालन छाया बुटले आणि कुंदा कुमलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण आसुटकर यांनी केले ९ तारखेला सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमानी महीला दिनाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वविसाठी
सर्व झुंबा योगा ग्रुपच्या महीलानी सहकार्य केले.

