ठळक बातम्या

    महावीर जयंतीनिमित्त वणीत भव्य शोभायात्रा; भक्तिमय वातावरणात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

     

    महावीर जयंतीनिमित्त वणीत भव्य शोभायात्रा; भक्तिमय वातावरणात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : दि. ३१ मार्च रोजी महावीर जयंतीच्या पावन निमित्ताने वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत जैन समाजासह विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.

    शोभायात्रेची सुरुवात शहरातील जैन मंदिरातून करण्यात आली. भगवान महावीरांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करून ती रथावर विराजमान करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘महावीर स्वामी की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

    कार्यक्रमादरम्यान महावीर स्वामींच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. तसेच समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

    या शोभायात्रेत स्थानिक आमदार संजय देरकर, शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया, महावीर कटारिया, खिवंसरा, बतराजी, विनोद ढुमने, मनिष बतरा, अभय झाबक आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

    शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन समाजातील पदाधिकारी, युवक मंडळे आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.




    Photo