ठळक बातम्या

    झी टॉकीज फेम बालकिर्तनकार माऊली महाराज जाहूरकर २६ मार्चला पिंपरी (कायर) मध्ये दाखल भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा श्री संत जगन्नाथ बाबांचा होणार जागर

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी/ कायर : दिनांक २६ मार्च रोज‌ गुरुवारला श्री राम नवमी सद्गुरु जगन्नाथ बाबा जन्मोत्सवा निमित्य सद्गुरु जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थान पिंपरी कायरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    यंदाच्या रामनवमी उत्सवात प्रमुख आकर्षण म्हणून झी टॉकीज फेम बालकिर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांच्या भव्य कीर्तनाचे‌ आयोजन करण्यात आले आहे.  

    विशेषता: माऊली महाराज हे त्यांच्या विनोदी आणि प्रबोधनपर कीर्तन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. झी टॉकीजवरील 'गजर भक्तीचा', मन मंदिरा या कार्यक्रमामुळे ते घराघरांत पोहोचले आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी, व त्यांच्या सुमधुर वाणीतून  प्रबोधनातून‌ भाविक भक्त येत्या २६ मार्चला दु. १.१६ वा. पिंपरी कायर येथे मंत्रमुग्ध होणार आहे. त्यांच्या कीर्तनाचा व त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. गजानन पावडे यांनी केले आहे.

    सकाळी ०८.१६ वा. नंदिगड देवस्थान पिंपरी कायर येथुन भव्य पालखी सोहळ्याला  प्रारंभ होईल.यात सुंदर बैलजोडी पालखी सजवून आणनाऱ्या भक्तास रोख, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

    दु. १.१६ वा. काल्याचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम होणार आहे.

    सादर कर्ते सुप्रसिध्द बालकिर्तनकार ‌ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर हे सादर करणार आहे

    दुपारी ३.१६  वा. महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

    या सोहळ्याचे सुत्र संचालन ह.भ.प. नयनपाल महाराज, शिंदोलाकर हे करणार आहे. 

    नैतिकता, समानता आणि भक्तिभावाचा दीप उजळवत सर्व समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या व्यसनमुक्तीकार महाराष्ट्र भूषण खेमराज महाराजांच्या सेवाभावी कार्याचा लौकिक सर्वदूर पोहोचलेला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री राम नवमी जगन्नाथ बाबा जन्मोत्सव  सोहळ्याला यात्रेचे रूप येणार असून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.



    Photo