विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : दिनांक २६/३/२६ वार गुरुवारला दरवर्षीप्रमाणे श्रीराम नगर येथे रामनवमी साजरी करण्यात आली. त्याचवेळी नवनियुक्त नगराध्यक्ष तथा शहराच्या प्रथम नागरिक मान.विद्याताई आत्राम ज्यांनी श्रीराम नगर वासियांसाठी रस्ते,नाली पाणी सुविधांसाठी भरघोस निधी दिला त्याबद्दल माजी आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार साहेब व नवनियुक्त वार्ड क्रमांक एक चे अजय धोबे व प्रणाली देऊळकर,
नवनियुक्त बँक प्रतिनिधी आत्माराम ताजने यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी प्रभू श्रीराम यांचे प्रतिमेचे विधिवध पूजन व सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी कलात्मक गुणांना वाव मिळावा करिता सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचवेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माननीय नगराध्यक्ष यांनी श्रीरामनगर साठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली माननीय बोदकूरवार साहेब यांनी त्याच्या कार्यकाळात भरघोस निधी दिल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला .
त्यावेळी माजी.आमदार साहेब यांनी शहराच्या नगराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर अजय धोबे यांनी वार्ड १ क्रमांक समस्या मांडत त्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करण्यात येईल असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नवनियुक्त वनी प्रक्षेत्र शालेय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र देरकर होते तर श्रीराम नगर कार्यकारी सोसायटी व श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष शरद रा तरारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
तर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन अश्विनी चांदणे यांनी केले. सत्कार सोहळ्याचे संचालन रवी चांदणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन धनंजय गाडगे,यांनी केले मुलांना पारितोषिक म्हणून पुस्तके देण्यात आली. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड, दिपक खोके,अनिल खरवडे, सुरपाम साहेब,प्रवीण झाडें,वसंत डाखरे, भास्कर मोरे, बळीराम बोबडे,प्रमोद जुनूनकर, संदीपकळस्कर, अशोक आवारी, मधुकर आत्राम, कैलास मेश्राम, वैभव राऊत, दुर्गेश्वर उरकुडे, प्रकाश डाहुले, गौरव ठाकरे, राजू झुंगरे, अजय महोतो, उमेश चौधरी,बालाजी डोहे, कुणाल बदखल, प्रवीण सोनटक्के, आणि समस्त महिला,पूरुष रहिवाशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले...







