विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : आज दि. २ एप्रिल २०२६ रोजी येथील भोंगळे/आवारी लेआउट परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
भगवान हनुमानाच्या प्रतिमेची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. वेदघोष, मंत्रोच्चार आणि भजन-कीर्तनाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. नागरिकांनी एकत्र येत श्रद्धेने पूजा केली व हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला.
या भक्तीमय वातावरणामुळे भोंगळे/आवारी लेआउट परिसर दिवसभर रामनामाच्या गजरात आणि हनुमान भक्तीच्या रंगात रंगून गेला.
यावेळी मणीष टोंगे,भाऊराव मत्ते,गोपाळा आवारी, संजय चिंचोलकर, प्रदीप वासेकर,अनिल खंगार,अक्षय वाघमारे, मारोती मिलमीले, अक्षय गोखरे,अमित काळे, अनमोल बोकडे , राकेश पराये,अवि कुंभरे,शाम तुमडे,शंकर ढूमणे, सुमीत काळे, चेतन मत्ते, राहुल रोडे,शुभम लखमापूरे,राजु धानोरकर,प्रविण जेनेकर,पिदूरकर, दुधगवळी, खाडे,पाचभाई, राजु पराये , विजय किनारे,
यांच्या उपस्थितीत हनुमान जयंती चा कार्यक्रम संपन्न झाला.






