विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : मेंढोली गावात सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
हनुमान जयंती निमित्त पूजा, आरती व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. तसेच, महाप्रसादाचे आयोजन करून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.






