विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : जनमानसामध्ये संस्कृत आणि भारतीय संस्कृती याविषयी आत्मीयता निर्मिती आणि प्रचार प्रसारासाठी कटिबद्ध असणाऱ्या संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्या वतीने श्री गुरुमाऊली उपासना मंडळ छोरीया ले आऊट वणी यांच्या संयुक्त विद्यमाने छोरीया ले आऊट परिसरातील हनुमान मंदिर येथे चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती पर्यंत श्रीनामरामायण या संपूर्ण रामायणाचा सारांश असणाऱ्या सुप्रसिद्ध स्तोत्र पठनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्कृत भारतीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ.प्रणीता भाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात त्यांनी उपस्थितांना शुद्ध उच्चारणाचे मार्गदर्शन करीत या स्तोत्राचे पाठ करून घेतले.


