ठळक बातम्या

    श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त वणी येथे ‘सुंदरकांड पाठ’ कार्यक्रमाचे आयोजन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त वणी शहरात धार्मिक वातावरणात ‘संगीतमय सुंदरकांड पाठ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान पार पडणार आहे.

    या कार्यक्रमात प्रमुख सादरीकरण प्रसिद्ध कीर्तनकार श्री. मनू महाराज तुगनायत व त्यांचा संच करणार असून, त्यांच्या सुमधुर व भक्तिमय शैलीत सुंदरकांडाचे गायन सादर होणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान व भक्तिरसाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

    कार्यक्रमाचे स्थळ श्री काळाराम मंदिर समोर, रामपूरा वॉर्ड, जत्रा रोड, वणी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे निश्चित करण्यात आले आहे. ‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.


    या पवित्र सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामपुरा वॉर्ड, मित्र परिवार वणी यांच्या कडून करण्यात आले आहे.





    Photo