विदर्भवार्ता|प्रतिनिधी
मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या बहारदार आणि बहुमुखी गायकीने त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. भावगीत, गझल, पॉप, आयटम साँग अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
आशा भोसले यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या आवाजाने अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

