ठळक बातम्या

    विविध सामाजिक संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन...

     *2011 पासून रखडलेली भारतीय जातनिहाय जनगणना  करा नंतरच डिमीलीटेशन दुरुस्ती विधेयक  सादर करा.*


    *आधी जातनिहाय जनगणना करा नंतरच डिलिमिटेशन वर  बोला* 

    *प्रवीण खानझोडे*  

    लढा संघटना 

    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी:- भारतामध्ये प्रस्तावित डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे देशातील सामाजिक, राजकीय व प्रादेशिक समतोल बिघडण्याची गंभीर शक्यता निर्माण होत आहे. सदर विधेयकाचा सखोल अभ्यास करता, त्यामधील तरतुदी या संविधानातील संघराज्यीय तत्त्वे, समान प्रतिनिधित्व व सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आम्ही खालील मुद्द्यांच्या आधारे या विधेयकास तीव्र विरोध नोंदवित आहोत.

    मुख्य आक्षेप व मुद्दे :

    १) डिलिमिटेशन प्रक्रियेत केवळ लोकसंख्येचा आधार घेतल्यास काही राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची, तर काही राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संविधानातील संघराज्यीय तत्त्वांना बाधा येऊ शकते.

    २) सदर प्रक्रियेमुळे सामाजिक समता धोक्यात येऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय घटकांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती निर्माण होते.

    ३) ग्रामीण व शहरी भागांमधील असमतोल अधिक तीव्र होऊन ग्रामीण भागाच्या हिताला बाधा पोहोचू शकते.

    ४) अद्ययावत व अचूक जनगणना उपलब्ध नसताना मतदारसंघांची पुनर्रचना करणे हे अन्यायकारक व अवैज्ञानिक ठरेल.

    ५) या विधेयकामुळे विविध राज्यांमध्ये प्रादेशिक असंतोष वाढण्याची शक्यता असून, त्याचा राष्ट्रीय एकात्मतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

    ६) प्रस्तावित प्रक्रिया ही संविधानातील समान प्रतिनिधित्व, न्याय व समतोल विकास या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

    आमच्या मागण्या :

    १) प्रस्तावित डिलिमिटेशन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी.

    २) सर्व राज्ये, सामाजिक घटक व संबंधित पक्षकार यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने व्यापक चर्चा व सल्लामसलत करण्यात यावी.

    ३) अद्ययावत जातीनिहाय जनगणनेच्या आधारे, पारदर्शक व वैज्ञानिक प्रक्रियेतूनच कोणताही निर्णय घेण्यात यावा.

    ४) सामाजिक व प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्वतंत्र व तटस्थ तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात यावी .यावेळी प्रवीण खानझोडे, अशोक चौधरी, आकाश दुबे, राजू तुराणकर, माजी नगरसेवक, नहिम अजीज भाई अजिंक्य शेंडे  शिवा मोरे, रवींद्र मेश्राम हरीश पाते  नियाज अली, जफर  खान,सूर्यकांत बुरबुरे, पांडुरंग पंडिले अशोक अंकतवार, आनंद घोटेकर, उपस्थित होते



    Photo