विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : मा. श्री. तारेन्द्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष, वणी तथा माजी यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष) यांचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस मोठ्या आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. युवा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करत, नगराध्यक्ष पदावर असताना वणी शहरात केलेल्या उल्लेखनीय विकासकामांमुळे त्यांनी जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे.
तारेन्द्र बोर्डे हे तरुण, तडफदार आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच वणीकरांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आदर आणि प्रेम आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर “विदर्भवार्ता/पत्र” पोर्टल न्यूजचे संपादक संजय चिंचोलकर (वणी) व मित्रपरिवार यांच्या वतीने मा. तारेन्द्र बोर्डे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
त्यांच्या पुढील वाटचालीस भरभराटीच्या आणि यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा!



