ठळक बातम्या

    वणी मध्ये नि: शुल्क संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : जनमानसामध्ये संस्कृत आणि संस्कृती बद्दल आपुलकी निर्माण साठी कार्यरत असणाऱ्या, संस्कृत जनसामान्यांची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्कृत भारतीच्या वतीने वणी येथील छोरीया टाऊनशिप मध्ये असणाऱ्या हनुमान मंदिरात दि. ६ एप्रिल ते दि. १३ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये रोज संध्याकाळी ६-३०  ते ८ या वेळात निःशुल्क संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

              वय वर्ष १० पेक्षा अधिक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या शिबिरात सहभागी होता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी संस्कृत भाषेच्या कोणत्याही पूर्व ज्ञानाची आवश्यकता नाही. 

              वर्ग पूर्ण केल्यानंतर आपण सहजपणे संस्कृत भाषेत आवश्यक संवाद साधू शकतो हे या शिबिराचे वैशिष्ट्य असणार आहे.

             संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारिणी सदस्या सौ. प्रणिता भाकरे या वर्गामध्ये हसत खेळत संस्कृत संभाषणाचे पाठ देणार आहेत. 

              वणी आणि परिसरातील ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्कृत भाषा शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. स्वानंद ग. पुंड 9822644611 नगर मंत्री महेश पुंड  8317207019  तथा वर्ग संयोजिका सौ. प्रणिता प्रशांत भाकरे 9823242949 यांच्यासोबत संपर्क करावा किंवा थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृत भारतीच्या वतीने करण्यात येत आहे.




    Photo