ठळक बातम्या

    जैताई देवस्थानच्या अध्यक्षपदी भारती सरपटवार यांची एकमताने निवड.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणीवणी नगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या जैताई देवस्थानाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय माधव  गंगाधर उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांच्या दुर्दैवी निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी भारती माधव सरपटवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

             सोमवार दि. ६ रोजी मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मंदिराचे सचिव ह.भ.प. भागवत कथाकार मनु महाराज तुगनायत यांनी  विश्वस्त म्हणून त्यांच्या निवडीच्या ठेवलेल्या प्रस्तावाला सदस्य श्री चंद्रकांत अणे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वांनुमते तो प्रस्ताव मान्य करण्यात आला. 


    जैताई देवस्थानातच यापूर्वी केलेले अनेक उपक्रम, लोकमत सखी मंच, वनिता समाज, वीणा वागेश्वरी भजनी मंडळ अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भारती ताईंनी केलेल्या आजवरच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा विचार करता आणि स्वर्गीय बाळासाहेब सरपटवार यांच्या संकल्पनेनुसार मंदिराची आजवर झालेली प्रगती अशीच अविरत राहावी या भूमिकेतून त्यांनाच अध्यक्ष करावे असा प्रस्ताव सदस्य हरिहर भागवत यांनी मांडला. ज्यावर सुप्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर यांनी अनुमोदन दिल्यावर सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

             या बैठकीला प्रशांत माधमशेट्टीवार, तुषार नगरवाला, जयंत लिडबिडे हे सदस्य देखील उपस्थित होते.

             माधवराव सरपटवार यांचे कार्य पुढे चालविण्यासाठी देवी जैताई च्या सेवेची ही गौरवशाली संधी प्राप्त झाली याबद्दल सर्वच क्षेत्रातून भारती सरपटवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




    Photo