ठळक बातम्या

    श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या विविध शाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी: श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था अंतर्गत राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व वणी पब्लिक स्कुल येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

    यामध्ये राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी औद्याेगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सिद्धांत तेलतुंबडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्याध्यापक अभय पारखी व सौ.अनिता टोंगे होते.कार्क्रमाचे संचालन तुषार घाने यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल गेडाम यांनी केले.तसेच वणी पब्लीक स्कुल येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ट शिक्षक सतिश बाविस्कर होते तर मार्गदर्शक म्हणुन सौ.अनुपाली खोब्रागडे,सुनिल गेडाम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना सागर देवगडे यांनी तर संचालन योगेश ढेंगळे यांनी व आभार प्रदर्शन अंजली पाझारे यांनी मानले.यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले. 




    Photo