ठळक बातम्या

    विजेचा घात! पाणी भरताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; शास्त्रीनगर वणीत हृदयद्रावक घटना

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : शहरातील शास्त्रीनगर परिसरात आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मृत महिलेचे नाव सौ. छाया नंदकिशोर घुले (वय ३५, रा. शास्त्रीनगर, मोक्षधामजवळ, वणी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या आपल्या घरात मोटारद्वारे पाणी भरत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेनंतर तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

    घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    या आकस्मिक घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपास वणी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.




    Photo