ठळक बातम्या

    न. प. शाळा क्रमांक ७ मध्ये आत्मरक्षनाचे प्रशिक्षण संपन्न


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी :  वणी  येथील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ७ मध्ये विद्यार्थिनींसाठी दिनांक ६ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत आत्मसंरक्षण प्रशिक्षण राणी लक्ष्मीबाई आत्मसुरक्षा योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत  शाळेतील विद्यार्थिनींना प्रतीक्षा खंडाळे व मानसी रंदाडे यांनी प्रीती बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वसंरक्षणाचे धडे दिले.

             सध्याच्या परिस्थितीत मुलींनी आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्यामुळे शासनाने शहरी भागातील विद्यार्थिनींना आत्म रक्षणासाठी सज्ज करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात शाळेतील विद्यार्थिनींना जुडो, कराटे तसेच विविध आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी व विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.


     हा  उपक्रम  शाळा व्यवस्थापन समितीचे पुढाकाराने मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी आयोजित केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे या शिक्षक वृंदाणी यात सहभागी होऊन विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत नियमितपणे विविध शालेय  व सहशालेय उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे.




    Photo