ठळक बातम्या

    महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन. माळी समाज बहुउद्देशीय संस्था वणी चा पुढाकार

     माळी समाज बहुउद्देशीय संस्था वणी चा पुढाकार


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त  दिनांक ११ एप्रिल 2026 रोज शनिवारला स. 11 वा. माळी समाज बहुउद्देशीय संस्था वणी च्या वतीने स्थानिक बस स्टँड समोर संस्थेच्या कार्यालयात सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

     या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुवार,  यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे तर स्वागताध्यक्ष डॉ. विनोदकुमार आदे राहणार आहे .

    प्रमुख पाहुणे म्हणून विद्याताई आत्राम (नगराध्यक्षा), सुरेखा तुराणकर (मा. सीडीपीओ),  राकेश बुग्गेवार (उपनगराध्यक्ष), संजय पिपळशेंडे (मा. सभापती) दीपक मत्ते (सरपंच) समीर लेनगुळे (सुप्रसिद्ध व्याख्याते) यांची उपस्थिती लाभणार आहे.

    या दिगजांच्या उपस्थितीमध्ये प्रमोद निकुरे , (शिवाजी व्यायाम शाळा-अध्यक्ष) रफिक रंगरेज (दलित मित्र पुरस्कार प्राप्त), सुरेश रायपुरे (मा.नगराध्यक्ष), डॉ. दिलीप अलोने (सुप्रसिद्ध नकलाकार), राम झिले (व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त, नकलाकार), नारायण  गोडे, (सामाजिक कार्यकर्ते), रवींद्र  कांबळे (आरोग्य सेवक), बंडू वाढई (सामाजिक कार्यकर्ते), हर्षल शेंडे (सामाजिक कार्यकर्ते)  

    व स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीवर रुजू  झालेले माळी समाजातील रत्नांचा तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे.

    आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे, उपाध्यक्ष महेश चौधरी, सचिव भास्कर वाढई यांनी केले आहे.



    Photo