मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश; परिसरातून कौतुकाचा वर्षाव
विदर्भवार्ता। प्रतिनिधी
वणी - वणी शहरातील प्रतिष्ठित कपडा व्यापारी श्री. दिपलालजी चौधरी यांचे पुतणे व सुनील चौधरी यांचे चिरंजीव कुमार रौनक सुनिल चौधरी याने दहावी CBSE परीक्षेत ९२.२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
रौनकच्या या यशामुळे चौधरी कुटुंबासह संपूर्ण वणी शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याने कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे.
त्याच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. पुढील शिक्षणातही तो याचप्रमाणे उत्तुंग यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रौनकच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


