विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: पो.स्टे.शिरपुर येथे दिनांक 13/05/2026 रोजी रात्री मिळालेल्या माहीती नुसार त्वरीत सपोनि/संतोष मनवर ठाणेदार सा व पो. स्टाँप यांनी शिरपुर ते चारगांव चौकी येथे नाकाबंदी करुन वणी ते शिरपुर रोडने येणा-या संशययित अशोक लेलँन्ड कंटेनर ला थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये 34 गोवंशिय बैल एकमेंकांना आखुड दोरीने बांधुन दिसले. सदर जनावराची वाहतुक करीत असल्या बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे व समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर वाहनात बैलाची कत्तली करीता गोंवंश जातीचे जनावरे घेवुन जात आहेत अशी खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेउन नमुद वाहनातील इसमाला त्यांचे नाव व गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव सरगम गुलाबसिंग धुर्वे याला विश्वासात घेउन विचारणा केली असता त्याने गौवंशिय तस्करी तोसिक अहमद रा. ताजबाग नागपुर व ईरफान रा. गडचांदुर जि. चंद्रपुर यांचे सांगणे वरुन करीत असल्याचे सांगितले वरुन वाहन क्र. NI 01 AG 1288 (अशोक लेलँन्ड) कि.अं. 20,000,00 व 34 गोवंशिय बैल कि. 6,80,000/-रु असा एकुण कि.26,80,000/-रु चा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 (सुधारणा सन 2015) कलम 5,5 (अ), 5 (ब), 9 (अ) सहकलम प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम कलम 11, 11(1), (घ), (ङ), (च), (ज) सहकलम 119 महाराष्ट्र पोलिस कायदा सहकलम 83,184/177 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा.श्री.कुमार चिंता साहेब. पोलीस अधीक्षक, यवतमाळ. मा.श्री. अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. सुरेश दळवे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि/संतोष मनवर ठाणेदार शिरपुर पोउपनि/धीरज गुल्हाने सा. पोहवा/इकबाल शेख, पोहवा / प्रशांत झोड, पोहवा/अविनाश बानकर, पोकॉ/मंगेश सलाम, पोकॉ/विजय फुलुके, पोकॉ/किरण दासरवार यांनी पार पाडली आहे.


