ठळक बातम्या

    पदवीसह, स्पर्धा परीक्षा आणि इतर अनेक विषयांचा सर्वोत्तम पर्याय - लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी हे आपल्या तालुक्यातील सर्वात प्राचीन, सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक सुविधा संपन्न महाविद्यालय आहे हे आपण जाणताच. 

             बी.ए ; बी.कॉम ; बी.एससी ; अशा कोणत्याही वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी खालील मुद्द्यांचे अवलोकन आणि चिंतन करावे. 

    * राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्व सुविधा उपलब्ध असणारे वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय. 

    * तब्बल सहा प्राध्यापक विविध अभ्यासक्रम मंडळावर असल्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या प्रत्येक नवीन निर्णयाची आणि बदलाची सर्वप्रथम आणि सुयोग्य माहिती मिळण्याची संधी.

    * *आगामी काळात येऊ घातलेल्या चार वर्षाच्या पदवीची सुविधा असणारे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय.* 

    * नियमित पदवीच्या सोबतच विविध प्रकारच्या *स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय परीक्षांच्या तयारीसाठी अनेक उपक्रम.* 

    * कोणत्याही तालुकास्तरावर क्वचितच असेल इतके भव्य आणि समृद्ध ग्रंथालय. 

    * बारा तास अभ्यासाची शांत आणि फ्री इंटरनेट सुविधा असणारा विशाल वाचन कक्ष.

    * विद्यापीठाच्या सर्व नियमांच्या आधारे भरती झालेले पूर्णकालीन, तज्ञ प्राध्यापक. 

    * महाविद्यालयात असणाऱ्या सर्वच विषयात पदव्युत्तर ( एम. ए./ एम. कॉम/ एम. एससी. शिक्षणाची एकाच छताखाली सोय.

    * दहा विषयांमध्ये पीएचडी संशोधन केंद्र 

    * विद्यार्थी विकास विभाग, आविष्कार सारख्या स्पर्धा, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना ( एन. एस. एस), राष्ट्रीय छात्रसेना ( एन.सी.सी.) अशा विभागांच्याद्वारे अनेक विषयात प्रत्यक्ष कार्य करण्याची आणि व्यक्तिमत्व विकासाची सुसंधी. 

    * गेल्या अनेक वर्षांपासून या विविध माध्यमातून अनेक विद्यार्थी विद्यापीठ आणि राज्यस्तरावर यशस्वी झाल्याचा सातत्यपूर्ण इतिहास. 

    * *सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे,जीओईसी स्वरूपामध्ये, स्पर्धा परीक्षा, वारली पेंटिंग, कराओके सिंगिंग, मेंहदी आणि हस्तकला, दैनंदिन जीवनात आयुर्वेद अशा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुविधा.*

    *  वारली पेंटिंग, ड्राय फ्लॉवर डेकोरेशन , गांडूळ खत, एलईडी बल्ब दुरुस्ती, साबण इ. वस्तूंची निर्मिती इत्यादी अभ्यासक्रमांच्या /उपक्रमांच्या  माध्यमातून तुमची तुम्हाला कमाई करता येईल असे कौशल्य मिळवण्याची सुविधा.

    * महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी.

    या सर्व गोष्टीचा विचार करता नियमित पदवीच्या सोबतच या सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचाच प्राधान्य क्रमाने विचार करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्यावतीने करण्यात येत आहे.



    Photo