विदर्भ वार्ता। प्रतिनिधी
वणी : येथील सर्वपरिचित राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 87.5 टक्के निकालाची नोंद केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत शाळेची गुणवत्ता कायम राखली.
या परीक्षेत कु. शिवाणी वर्मा हिने ७२% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कु. पूर्वा राऊतिया हिने ६८.४०% टक्के गुणांसह द्वितीय तर कु. प्रणाली गाथाडे हिने ६८% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य मा. विक्रांत चचडा तसेच मुख्याध्यापक श्री. अभय पारखी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक व पालकांच्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले.


