ठळक बातम्या

    पाणी विकणाऱ्या गाड्या चालकांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्याची मागणी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी:–वणी येथील पाण्याचा व्यवसाय करणारे अनेक प्लांट धारक 10 ते 20 रुपये प्रमाणे पाणी छोट्या गाडीतून गल्लोगल्ली फिरत विकतात. हे  गाडी चालक रस्त्यावर गाडी उभी करून घरोघरी पाणी विकत असताना रस्ता जाम करतात. गाडी बाजुला लावायची विनंती केली की, ते जोरजोरात बोलून मुजोरी करण्याचे प्रमाण वणी शहरात खूप वाढले आहे. याला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

        वणी शहरासह सर्वत्र थंड व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. त्यातूनच वणी शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अनेक प्लांट धारकांचा व्यवसाय सुरू आहे. हे पाणी किती फिल्टर  असते, किती शुद्ध असते ही बाब वेगळी आहे. नगर परिषदेकडे सध्या शुद्ध पाणी पुरविण्याचे संयंत्र नसल्यामुळे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. गल्लीगली पाण्याचे एटीएम 10 रुपयाचे नाणे टाकून 20 लिटर पाणी देण्याचे केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. 


     हे पाणी विकणाऱ्या गाडीवर असणारे चालक पाणी विकत असताना प्रत्येक गल्ली मधून गाडी फिरवता. ग्राहकांना कॅन मधून किंवा त्यांच्या टाकीतून पाणी देताना गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करतात. त्यांना रस्त्यावर चालू असलेल्या वाहतुकीशी काहीही देणेघेणे नसते. तुम्ही आपल्या गाडीचा कितीही हॉर्न वाजवत रहा किंवा आवाज द्या ते पाणी वितरित होईपर्यंत बाजूला होत नाहीत. वरून थांबा ना  चाललो कशाला घाई करता असे रागावून बोलतात. यात पाण्याच्या प्लांट धारकाचा काही दोष नसतो. पण या मुजोर गाडी चालकांना त्यांनी सुद्धा सक्त ताकीद देण्याची व पोलिस प्रशासनाने या प्लांट धारकांना तांबी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.





    Photo