ठळक बातम्या

    उज्ज्वल भविष्यासाठी वणी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; नर्सरी ते बारावीपर्यंत प्रवेश खुले

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शहरातील नामांकित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेले वणी पब्लिक स्कूल ॲंन्ड  ज्युनिअर कॉलेज, एम.आय.डी.सी. परिसर, वणी येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले करण्यात आले असून पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

    इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या संस्थेमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतचे वर्ग उपलब्ध असून अकरावी व बारावीमध्ये सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि कॉमर्स शाखांचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर विद्यालयात विशेष भर दिला जातो.

    माहिती तंत्रज्ञान (IT Subject), आधुनिक शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग, सुसज्ज वर्गखोल्या तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम ही विद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.

    “आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशेची निवड करा आणि आजच वणी पब्लिक School ॲंन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करा,” असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

    प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी सकाळी ते दुपारी या वेळेत विद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


    संपर्क : ९३२५२६०९५९

    वणी पब्लिक स्कूल ॲंन्ड ज्युनिअर कॉलेज, एम.आय.डी.सी. परिसर, वणी.



    Photo