ठळक बातम्या

    “मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला हंसराज अहीर यांचा सलाम; सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाला दिला ब्रेक”

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका-इस्राईल संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. हर्मुझ समुद्रधुनीसह महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांवर अस्थिरता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करून इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

    पंतप्रधानांच्या या आवाहनाला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री Hansraj Ahir यांनी तात्काळ प्रतिसाद देत आदर्श निर्माण केला आहे. हंसराज अहीर यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला असून, गरजेनुसारच वाहनांचा वापर करण्याचे जाहीर केले आहे.

    आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हंसराज अहीर म्हणाले, “देश कठीण परिस्थितीतून जात असताना प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले इंधन बचतीचे आवाहन हे केवळ सरकारचे नव्हे तर देशहिताचे आवाहन आहे. त्याला प्रतिसाद देत मी माझ्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या छोट्या बचतीतूनच मोठा राष्ट्रीय फायदा होऊ शकतो.”

    दरम्यान, देशात वाढत्या इंधन वापराच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनीही साधेपणा स्वीकारून जनतेसमोर आदर्श ठेवावा, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. हंसराज अहीर यांच्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या या कृतीला “देशहितासाठीचा संवेदनशील निर्णय” म्हणून गौरवले जात आहे.

    भारतीय जनता पार्टी चे ओ बी सी मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.श्नी,पवण ऐकरे यांनी  मा.अहीर साहेब यांचे स्वागत केले आहे.





    Photo