विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वणी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी, पात्र आणि इंग्रजी माध्यमात अध्यापन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार प्री-प्रायमरी शिक्षक (नर्सरी ते केजी-२), इंग्रजी, हिंदी, सामाजिक शास्त्र (SST), ड्रॉईंग/आर्ट अँड क्राफ्ट, कॉम्प्युटर तसेच गणित विषयांसाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासोबत बी.एड., मॉन्टेसरी ट्रेनिंग, ड्रॉईंग डिप्लोमा किंवा एम.एस्सी.-कॉम्प्युटर/एमसीए अशी आवश्यक पात्रता नमूद करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी स्वतः अर्ज लिहून सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २० मे २०२६, बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजता शाळेच्या एमआयडीसी परिसरातील कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.
वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.


