ठळक बातम्या

    नंदिगड देवस्थान पिंपरी येथे प्रथमच बाल सुसंस्कार शिबिर; शंभर बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    पिंपरी : नंदिगड देवस्थान पिंपरी येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराला मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे शंभर बालकांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे. बालकांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांसाठी आयुष रोहिदास ठाकरे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. नयनपाल महाराज शिंदोलाकर यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आयोजक मंडळाकडून मुलांची उत्तम काळजी घेत जबाबदारीपूर्वक शिबिर यशस्वीपणे पार पाडले जात आहे.

    बालकांचा मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्कारमूल्यांवर आधारित अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये चांगल्या विचारांची जडणघडण होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

    यावेळी सद्गुरू खेमराज महाराज, नयनपाल महाराज, तात्या पाटील पावडे, आयुष रोहिदास ठाकरे, राजेश सोयाम गुरुजी, गजानन मत्ते गुरुजी, सौरभ सर, प्रिया मॅडम, प्रद्युमन उरकुडे सर, सचिन भाऊ तुराणकर, प्रणय बदखल, प्रशांत डहाकी, लताताई ठावरी, मायाताई उरकुंडे, पंछपुलाबाई डहाकी, हरीशजी ठाकरे, अशोक पा. मडावी, हरिदास पा. गौरकार, मोरेश्वर भाऊ परागे, पिंटू भाऊ चेंदे तसेच इतर सहकारी मित्रपरिवार उपस्थित होते.




    Photo