विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या प्रगतीनगर व बजरंग नगर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिसरातील विद्यमान डी.पी.वर अतिरिक्त भार वाढल्याने वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर मा. सहाय्यक अभियंता, विद्युत वितरण कंपनी, वणी शहर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरात नवीन डी.पी. बसविण्याची मागणी करण्यात आली. तसेच “निरंतर वीज योजना” अंतर्गत नवीन रोहित्र बसविण्याचे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यावेळी भाजपा नगरसेविका सौ. रिताताई पहापळे, भाजपा वणी शहर सरचिटणीस आशिष डंभारे, भाजपा उपाध्यक्ष गणेश असुटकर, महेश पहापळे तसेच देशपांडे सर उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांना सुरळीत आणि योग्य दाबाने वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने या समस्येवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



