ठळक बातम्या

    “आमची जमीन, आमचा अधिकार” : गोंडपिंपरीत एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    गोंडपिंपरी: गोंडपिंपरी तालुका व करंजीसह एकूण ११ गावांच्या शेतीजमिनीवर प्रस्तावित एमआयडीसीची योजना राबविण्याच्या विरोधात स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माता कन्यका सभागृह, गोंडपिंपरी येथे भव्य शेतकरी परिषद व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

    “आमची जमीन, आमचा अधिकार – एमआयडीसीला आमचा ठाम नकार” या घोषणांनी परिसरात आंदोलनाची चळवळ अधिक तीव्र झाली.

    शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पामुळे गावांचे अस्तित्व धोक्यात येईल, शेती उद्ध्वस्त होईल आणि पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल.

    कार्यक्रमात शेतकरी हक्क, जमीन अधिग्रहण, कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन मार्गदर्शन याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. दुपारी ३ वाजता हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माता कन्यका सभागृह ते उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंडपिंपरी येथील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढला गेला. यामध्ये महिलांचा व युवकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.

    स्थानिक शेतकरी संघटना, ग्रामस्थ, समाजप्रमुख, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला व्यापक पाठिंबा जाहीर होता.

    शेतकऱ्यांचे एकच आवाहन — “गाव वाचवायचे असेल, शेती वाचवायची असेल तर एकत्र या…!”यावेळी प्रामुख्याने उपस्थित मान. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार

    (माजी मंत्री, माजी विरोधी पक्ष नेते विधानसभा महाराष्ट्र)

    : माजी आमदार ॲड श्री. वामनराव चटप (शेतकरी नेते)

    : मान. शालीकराव मावलीकर साहेब

    : मान.ॲड. बोधी रामटेके (नागपुर हायकोर्ट),किशोर वड्डेटीवार,

    मान.ॲड. दिपक चटप (नागपुर हायकोर्ट), मा.रामकृष्ण सांगडे,राजेश कवठे,कमलेश निमगडे,

    मान. प्रकाशजी तावाडे (चंद्रपूर)

    मान. मोरेश्वरजी सुस्कर (ओबीसी नेते)

    मान. भारतभाऊ चंद्रागडे

    या सर्वांच्या नेतृत्वाखाली या शेतकरी जनहित सभा पार पडली.




    Photo