ठळक बातम्या

    धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश रासेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: वणी येथील धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच वेस्टर्न कोल इंडिया लिमिटेडचे कर्तव्यदक्ष कर्मचारी मा. श्री. मंगेश रासेकर यांचा आज वाढदिवस. 

    समाजकार्य, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली आपुलकी यामुळे मंगेश रासेकर यांनी वणी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला असून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

    त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

    धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा वेस्टर्न कोल इंडिया चे कर्मचारी मा. श्री. मंगेश रासेकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

    आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण समाजसेवेच्या माध्यमातून असेच जनतेची सेवा करत राहा व आपल्या कार्याचा गौरव अधिकाधिक वाढत राहो, ही सदिच्छा.

    — श्री. संजय चिंचोलकर

    संपादक, विदर्भ वार्ता/पत्र पोर्टल न्यूज चॅनल, वणी

    प्रतिनिधी, यवतमाळ मार्मिक



    Photo