विदर्भ वार्ता। प्रतिनिधी
वणी : प्रेम, आणि आपुलकीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक दांपत्यासाठी खास क्षण असतो. अशाच आनंददायी क्षणी सौ. सोनाली ताई विजय शिरपूरकर व विजय शिरपूरकर यांचा लग्न वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
विजय शिरपूरकर हे सौदी अरेबिया येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत असून आपल्या मेहनत, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशामध्ये सौ. सोनाली ताई यांची मोलाची साथ लाभली आहे.
या शुभदिनानिमित्त त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे वैवाहिक जीवन आनंद, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने सदैव बहरत राहो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांना लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…! 💐
शुभेच्छा देत आहे - सौ, मंगलाताई संजय चिंचोलकर वणी



