विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: वणी तालुक्यातील येनक येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व तसेच अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सुनिल माधव उपरे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. आपल्या सामाजिक कार्यातून आणि जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत त्यांनी परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुनिल उपरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्याचा लाभ अनेक गरजू व वंचित घटकांना मिळाला असून समाजातील विविध स्तरातील लोकांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विदर्भ वार्ता न्यूज पोर्टल, वणी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व सुनिल माधव उपरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक कार्यासाठी अधिक यश लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
– विदर्भ वार्ता न्यूज पोर्टल, वणी



