विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये नेत्र आरोग्यविषयक जागृती व्हावी आणि त्यामध्ये काही समस्या असल्यास त्याची निराकरण व्हावे या दृष्टीने प्राधान्याने महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून सर्वच समाजासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिकेत दिलीप अलोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या यां नि:शुल्क नेत्र तपासणीच्या सुसंधीचा महाविद्यालयातील सात शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि ५३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.



