ठळक बातम्या

    मारेगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मोफत बस सुविधा व शिष्यवृत्तीचा लाभ


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी - मारेगाव : श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १९९३ पासून गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देणारी ही संस्था महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त आहे.

    संस्थेत डी. फार्मसी (२ वर्षे), बी. फार्मसी (४ वर्षे) तसेच डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी. फार्मसी डायरेक्ट सेकंड इयर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, वाहतूक सुविधा आणि प्लेसमेंट मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

    विशेष बाब म्हणजे वणी ते मारेगाव दरम्यान विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांअंतर्गत मुलींसाठी १०० टक्के शुल्कमाफी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर पात्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या नियमांनुसार ५० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो.

    फार्मसी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव ही एक उत्तम संधी असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

    प्रवेशासाठी संपर्क : 📞 86250 01734 / 94231 31734

    पत्ता : इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव, जि. यवतमाळ – ४४५३०३.




    Photo