विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी/ब्राम्हणी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ब्राम्हणी गावात २१ जून रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
योग दिन कार्यक्रमात ब्राम्हणी गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायाम करून निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व जाणून घेतले.
यावेळी योग हा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
योग दिनाच्या निमित्ताने ब्राम्हणी गावात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले.



