ठळक बातम्या

    इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या निकालाची परंपरा कायम

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वणी येथील डी. फार्म अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेची शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे. परीक्षेतील उत्कृष्ट निकालामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि संस्थेच्या शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

           डी. फार्म प्रथम वर्षामध्ये दिव्या सुधाकर लोहे हिने ७२.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. उन्नती संजय पांडे हिने ७०.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर सलोनी विनोद क्षीरसागर हिने ६९.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

              डी. फार्म द्वितीय वर्षाच्या निकालात प्रीतिका विनायक अन्नमवार हिने ८१.८२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. अंकिता संदीप जुंगारी हिने ७७.९१ टक्के गुणांसह द्वितीय, तर स्नेहा विनोद झोडे हिने ७७.०९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

    विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार,प्राचार्य सुधाकर रेड्डी  प्राध्यापकवर्ग व व्यवस्थापनाने त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उत्कृष्ट निकाल लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक आणखी उंचावला असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.



    Photo