विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : दि. २६ जून रोजी वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांची १४९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रभारी प्राचार्या सौ. आश्लेषा जेणेकर मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. सतीश बाविस्कर व श्री. तेलंग सर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार आणि बहुजन कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत शाहू महाराजांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन सौ. वंदना बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

