विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त २९ जून २०२६ रोजी वणी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्हा संघटक मा. श्री. विजयबाबू चोरडिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी, वणी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या सहकार्याने जेताई मंदिर, वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्र तपासणी, नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप, अस्थिरोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग तसेच त्वचारोग अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप केले जाणार आहे.
या आरोग्य शिबिराचा लाभ वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होणार असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम ठरणार आहे.
या उपक्रमासाठी वणी येथील तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, मारेगावचे तालुका प्रमुख विशाल किन्हेंकार, शहर प्रमुख विजय मेश्राम तसेच झरीचे तालुका प्रमुख बाळू चेडे व शहर प्रमुख नाना सुगंधे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
संपर्क :
शुभम गोरे – 7972284238
राहुल पारखी – 9169461616
प्रसाद ठाकरे – 9579556932
शिवराज पेचे – 9929925255
विशाल किन्हेंकार – 8668364937
विजय मेश्राम – 9370745327
बाळू चेडे – 9373036145
नाना सुगंधे – 9921492333


