ठळक बातम्या

    ‌‍ विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या नवीन कार्यकारिणी ची एकमताने निवड.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या झालेल्या आम सभेमध्ये २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. 

             यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सचिव पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रा. डॉ अभिजित रमेशराव अणे यांची सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी निवड झाली. पूर्वाध्यक्ष डॉ. दिलीप आलोणे यांची कार्याध्यक्ष तर पूर्व उपाध्यक्ष गजाननराव कासावार यांची प्रमुख मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली. त्यात सोबत उपाध्यक्षपदी अशोकराव सोनटक्के , सचिव पदी राजेश महाकुलकार, सहसचिव गजानन भगत, कोषाध्यक्ष डॉ. स्वानंद पुंड, कार्यक्रम प्रमुख प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. 

             सदस्य पदी जयंत लिडबिडे यांना कायम ठेवण्यात येऊन त्यांच्यासोबत श्रीमती भारती सरपटवार, सौ.लता पांडे तथा अरुण कावडकर यांना सर्वानुमते सदस्य स्वरूपात निवडण्यात आले.


             सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे अभिनंदन 



    Photo