ठळक बातम्या

    वडसावित्री निमित्त मुंगोली (शिंदोला) पुनर्वसनस्थळी वडाच्या रोपाचे वृक्षारोपण; उपविभागीय अधिकाऱ्यांचा दौरा रद्द

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : मुंगोली (शिंदोला) गावाच्या पुनर्वसनस्थळी मा. उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निकृष्ट दर्जाच्या कामांची पाहणी तसेच वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्याचा नियोजित दौरा होता. मात्र शासकीय कामानिमित्त हा दौरा रद्द झाल्याने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने गावकऱ्यांच्या हस्ते वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.

    या प्रसंगी ग्रामसेवक समंदर शेख, बाबाराव ठाकरे, आयुष ठाकरे, रवींद्र वाटेकर, गजानन भोस्कर, कविता पुरडकर, आशा शिंदे, प्रतिभा क्षीरसागर, प्रशांत आत्राम, अवी बाचूलकर तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वटसावित्रीच्या पावन पर्वानिमित्त वडाचे झाड लावून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून दिला.

    वटसावित्री निमित्त संदेश :

    "वडाचे झाड म्हणजे दीर्घायुष्य, समृद्धी आणि निसर्गसंवर्धनाचे प्रतीक. वटसावित्रीच्या पवित्र निमित्ताने प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया. वृक्ष वाचवा, पर्यावरण जपा आणि भावी पिढीसाठी हिरवीगार पृथ्वी निर्माण करूया."

    Photo