ठळक बातम्या

    दिवंगत मुख्याध्यापक गजाननराव पहापळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा परीक्षार्थींना ज्ञानाची अमूल्य भेट; स्वामी विवेकानंद वाचनालयात पुस्तकांचे लोकार्पण

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: दि. ३० जून २०२६ दिवंगत सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजाननराव पहापळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने समाजाप्रती प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वणी येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त संदर्भग्रंथ व अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तकांची भेट देण्यात आली.

    ज्ञानदान हेच सर्वोत्तम दान मानले जाते. याच विचारातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा निश्चितच मोठा लाभ होणार असून, त्यांच्या यशाच्या प्रवासाला ही पुस्तके नवी दिशा देतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

    यावेळी माजी नगराध्यक्ष पिके टोंगे, दिलीपभाऊ मालेकर, कुचनकर साहेब, वैभव ठाकरे, राजेश पहापळे, महेश पहापळे, महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ, रिता म पहापळे आणि सौ,शारदा रा पहापळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निखिल वैरागडे यांनी केले.

    गजाननराव पहापळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत ज्ञानाचा वारसा जपण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.

    सौ,रिता म पहापळे (महीला व बालकल्याण सभापती वणी) यांनी 

    जनतेसाठी प्रेरणादायी संदेश दिला.

    "माणूस जग सोडून जातो, पण त्याने दिलेले संस्कार, शिक्षण आणि समाजासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहते. फुले नव्हे तर पुस्तके द्या, कारण फुले काही क्षणात कोमेजतात; परंतु पुस्तके अनेक पिढ्यांचे भविष्य घडवतात. प्रत्येक स्मृतिदिनी समाजोपयोगी उपक्रम राबवूया, ज्ञानदानाची परंपरा जोपासूया आणि सुशिक्षित, सक्षम भारत घडविण्यास हातभार लावूया."



    Photo