ठळक बातम्या

    वणी पोलीस ठाण्याला नवे ठाणेदार; भानुदास पिदूरकर यांची नियुक्ती

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांची यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील भानुदास पिदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली.

    यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून वणी येथे कार्यरत राहिल्याने पिदूरकर यांना शहर व ग्रामीण भागाची चांगली माहिती आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

             




    Photo