विदर्भवार्त। प्रतिनिधी
नागपूर:दिल्ली येथील जंतर-मंतरवर कोक्रोच जनता पार्टीच्या वतीने अभिजित दीपके यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी व लद्दाख ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला घेऊन सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुरू आहे. 'विदर्भ राज्य आंदोलन समिती'च्या (विराआस) शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात विराआसचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, विदर्भ प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते आणि कोअर कमिटी सदस्य श्रीमती पद्माताई राजपूत यांचा समावेश होता.
यावेळी ॲड. वामनराव चटप यांनी उपोषण स्थळावरून उपस्थितांना संबोधित केले आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने या आंदोलनाला जाहीर समर्थन घोषित केले.


